• Knowledge session / Webinar
  • Marathi
  • Online
  • 1 hr 30 mins

निधी उभारणी योग्य कथनासह प्रस्ताव व्यवहार्य बनवणे

Fundraising
Category
Sector Agnostic (SA)
Target Sectors
Thu 16 Apr 2026
03:00 PM to 04:30 PM

Event has already passed and is no longer accepting registrations.

Watch session recording & access related resources
Share

प्रत्यक्षात उत्तम काम करूनही तुमच्या निधी प्रस्तावांना नकार मिळाला आहे का?
काही प्रस्तावांना सहज निधी मिळतो, तर तत्सम काम करणारे इतर प्रस्ताव दुर्लक्षित का होतात — असे का होते हे समजणे तुम्हाला अवघड वाटते का?
निधी देणाऱ्यांना आकडेवारीने गोंधळात न टाकता तुमची कथा अधिक नेमकी आणि विश्वासार्ह पद्धतीने कशी मांडायची याबद्दल तुमच्या मनात गोंधळ आहे का?

जास्तीत जास्त नाकारले जाणारे प्रस्ताव खराब लेखनशैलीमुळे नाकारले जात नाहीत, तर ते अस्पष्ट असतात किंवा निधी देणाऱ्यांना नेमकं काय अपेक्षित आहे याच्याशी सुसंगत नसतात. या सत्रात सहभागी लोकांना निधी अर्जांना कमकुवत करणाऱ्या कथनात्मक त्रुटी (narrative gaps) कशा ओळखाव्यात आणि त्या सुधारण्यासाठी व्यावहारिक तंत्रे कशी वापरावी हे शिकायला मिळेल. तसेच हे सत्र संस्थांना त्यांची निधी मिळवण्याची तयारी तपासण्यात मदत करेल आणि स्व-संपादन (self-editing) कौशल्याची ओळख करून देईल, ज्यामुळे प्रत्येक प्रस्ताव सादर करण्यापूर्वी स्पष्टता, विश्वासार्हता आणि सुसूत्रता सुधारता येईल.

सत्रातील महत्त्वाचे मुद्दे

  1. तुमच्या प्रस्तावांमध्ये काय कमतरता आहेत हे ओळखा: चांगली कामगिरी असूनही प्रस्ताव निधी मिळवण्यासाठी पात्र का ठरत नाहीत आणि निधी देणाऱ्यांना त्यामध्ये काय कमी जाणवते हे ओळखण्यासाठी एक स्पष्ट निदान प्रणाली (डायग्नोस्टिक फ्रेमवर्क) शिका.

  2. कथनातील नेमकेपणा आणि पुरावे अधिक दृढ करा: प्रस्तावांना आकडेवारीने भरलेले दस्तऐवज न बनवता, अधिक वैशिष्ट्यपूर्ण आणि खात्रीशीर बनवण्यासाठी व्यावहारिक तंत्रे वापरा.

  3. परिपूर्ण परिणाम नसतानाही विश्वासार्हता सिद्ध करा: अंतिम परिणाम अजून सिद्ध होणे बाकी असले किंवा पूर्णपणे नोंदवले गेले नसले तरी, विश्वासार्हता आणि शिकण्याची प्रक्रिया कशी दर्शवायची हे समजून घ्या.

  4. तुमचा फंडिंग रेडीनेस तपासा: तुमच्या संस्थेच्या निधी उभारणी तयारीमध्ये असलेल्या त्रुटी ओळखा, ज्यामुळे प्रस्तावाच्या यशामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे.

  5. व्यवहार्य स्व-संपादन करणे: प्रस्ताव सादर करण्यापूर्वी त्यात सुधारणा करून अधिक मजबूत करण्यासाठी, प्रस्तावाचे स्व-संपादन करण्याची पद्धत शिका.

कोणासाठी उपयुक्त
हे सत्र निधी उभारणी समन्वयक, प्रोग्रॅम मॅनेजर्स आणि NGO संस्थापकांसाठी आहे. जे लोक दरवर्षी अनेक निधी प्रस्ताव लिहितात आणि त्या प्रस्तावांमध्ये प्रभावी कथाकथन व स्पष्ट भूमिका अधिक चांगल्या पद्धतीने मांडू इच्छितात, त्यांच्यासाठी हे सत्र विशेषतः उपयुक्त ठरेल

अतिरिक्त संसाधने

जर तुम्हाला या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही खालील अतिरिक्त संसाधनांचा अभ्यास करू शकता-


नालंदाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि तिच्याशी संपर्क साधण्यासाठी, येथे क्लिक करा.

नालंदा जोगळेकर

India Partner Network
Partners

--

More Upcoming Events